John Abraham : ‘धूम ४’ मध्ये पुन्हा जॉनची वर्णी | पुढारी

John Abraham : 'धूम ४' मध्ये पुन्हा जॉनची वर्णी

पुढारी ऑनलाईन : ‘धूम’, ‘धूम २’ आणि ‘धूम ३’ नं आता यशराज फिल्म्स या फ्रेंचायजीचा चौथा भाग आणणार असल्याची चर्चा आहे. ‘धूम’ च्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागात अभिनेता जॉन अब्राहमने ( John Abraham ) निगेटिव्ह भूमिका साकारली होती. ‘धूम २’ मध्ये ऋतिक रोशन आणि धूम ३’ मध्ये आमीर खान निगेटिव्ह भूमिकेत झळकले होते. आता ‘धूम ४’ मध्ये पुन्हा एकदा जॉनची वर्णी लागली असून तो नकारात्मक भूमिका साकारणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

पहिल्या भागाचा क्लायमॅक्स ओपन एंडेड होता. त्यामुळे जॉनच्या ( John Abraham ) पात्राचा मृत्यू झाला होता की, तो पळून गेला होता याबद्दल अनिश्चितता होती. त्यामुळे ‘धूम’ मध्ये त्यांचे पात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते. पण, अद्याप यशराजकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यावर्षाच्या सुरूवातीला जॉनने शाहरूख खानच्या पठाण मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. निगेटिव्ह भूमिकेत जॉनला लोकांनी पसंत केले.

Back to top button