आलिया 'मेट गाला' साठी न्यूयॉर्कला | पुढारी

आलिया 'मेट गाला' साठी न्यूयॉर्कला

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट मेट गाला साठी न्यूयॉर्कला रवाना झाली आहे. नुकताच तिचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ समोर आला आहे. मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच, येत्या १ मे रोजी मेट गालाचे आयोजन करण्यात आले आहे. या इव्हेंटमध्ये फैशन आणि एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीशी संबंधित लोकांचा सहभाग असेल. आलिया या कार्यक्रमात प्रबल गुरुंगच्या आऊटफिटमध्ये दिसणार आहे.

आलिया भट्ट लवकरच हॉलीवूड इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. हार्ट ऑफ स्टोन या अॅक्शनपटात ती गर्ल गॅडोटसह झळकणार आहे. या चित्रपटात गॅल, जेमी आणि आलिया व्यतिरिक्त सोफी ओकोनेडो, मॅथियास, श्र्वेघोफर, झिग लुसी आणि पॉस रेडी देखील आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

याशिवाय करण जोहर दिग्दर्शित की और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटात आलिया झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर सिंग मुख्य भूमिकेत आहेत. तसेच जया बच्चन, शबाना आझमी आणि धर्मेद्र यांच्याही महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. रोमँटिक कॉमेडी ड्रामा चित्रपट २८ जुलै २०२३ रोजी रीलिज होणार आहे.

( video : viralbhayani instgram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button