Suniel Shetty : अथियाला ट्रोल केले की वाईट वाटते! | पुढारी

Suniel Shetty : अथियाला ट्रोल केले की वाईट वाटते!

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूडमधील आघाडीच्या नायकांमध्ये सुनील शेट्टीचा समावेश होतो. नुकतेच सुनीलने सोशल मीडियाचा आयुष्यावर होणार्‍या परिणामांबाबत खुलेपणाने भाष्य केले आहे.

लेक अथियाला ट्रोल केले जाते, त्यावेळी खूप वाईट वाटते. सोशल मीडिया तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. कधी-कधी यामुळे मला जास्त बोलायला भीती वाटते. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात काहीच प्रायव्हसी राहिलेली नाही. त्यामुळे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होते. एखादे वक्तव्य विविध प्रकारे एडिट केले जाते, विविध अर्थ काढले जातात. त्यामुळे मला मोकळेपणे बोलण्याचीही भीती वाटते. कोणत्याही गोष्टीवर मत मांडताना तुम्ही आम्हाला विचार करायला भाग पाडता.

टीका करणारे कोण असतात? ज्यांना मी ट्विटर किंवा फेसबुकवरही ओळखत नाही. माझ्या कुटुंबाला शिवीगाळ करणे, माझ्या मुलीला अथियाला शिवीगाळ करणे. हे सगळं पाहून मला खूप वाईट वाटते. कारण मी जुन्या विचारांचा आहे, हे सर्व पाहून खूप वाईट वाटते. मात्र, हे सर्व पाहून आपण गप्प बसणार नाही. असे सुनील शेट्टी म्हणाला.

Back to top button