रकुल प्रीत ‘या’ साऊथ स्टार्ससोबत होती रिलेशनशीपमध्ये?

रकुल प्रीत ‘या’ साऊथ स्टार्ससोबत होती रिलेशनशीपमध्ये?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने आपला वाढदिवस साजरा करत यानिमित्ताने तिने आपल्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज दिली आहे. यात रकुल प्रीत सिंहने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून अभिनेता जॅकी भगनानी याला डेट करत असल्याचा खुलासा केला आहे. परंतु, माहिती आहे काय? जॅकी भगनानीच्या आधी रकुल प्रीत साऊथ अभिनेता राणा दग्गुबतीसोबत रिलेशनशिफमध्ये होती.

राणा दग्गुबती आणि रकुल प्रीत सिंह यापूर्वी अनेक कार्यक्रम आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये एकत्रित स्पॉट झाले होते. याशिवाय रकुल आणि राणा दग्गुबती काही मित्रांसोबत मजामस्ती करतानाही दिसले होते. सोशल मीडियावर देखील दोघेजण एकत्रित असतानाचे फोटो व्हायरल झाले होते.

सोशल मीडियावरील फोटोत रकुल आणि राणा एकत्र असून मित्रासोबत वेगवेगळ्या पोझ देताना दिसले होते. या सगळ्यावरून रकुल प्रीत आणि राणामध्ये अफेअर सुरू असल्याचे चाहत्यांनी कयास लावला होता.

याशिवाय चाहत्यांना रकुल आणि राणा यांची केमिस्ट्री खूपच आवडली होती. याच कारणामुळे राणा आणि रकुलचे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहते त्याला लाईक्स आणि कॉमेन्टसचा पाऊस पडत होता

अफेअरविषयी रकुलने सोडले मौन

राणा दग्गुबती आणि रकुल प्रीत सिंह यांच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर सर्वत्र पसरवू लागली. त्यावेळी रकुल एका मुलाखतीत आपली प्रतिक्रीया दिली. या मुलाखतीत रकुल म्हणाली होती की, 'मी अभिनेता राणा दग्गुबतीला डेट करत नाही. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. मी हैदराबादमध्ये एकटीच राहते. म्हणून माझे हैदराबादमध्ये काही मित्र आहेत.

या मित्रांमध्ये राणा दग्गुबतीचा नावाचा समावेश आहे. राणा दग्गुबती माझ्यासाठी मित्रांच्यामधील एक भाग आहेत. होय हे खरे आहे की, आमच्या मित्रांमध्ये फक्त २-३ मित्र अविवाहित आहेत.'

राणा दग्गुबतीचा तिच्या शेजारी होता

याशिवाय एका मुलाखतीदरम्यान रकुल प्रीतने राणा दग्गुबती हे आपल्या शेजारी राहत असल्याचे देखील सांगितले होते. शेजारी असल्यामुळेच आमच्यात इतकी चांगली मैत्री असल्याचे म्हणाली होती.

यानंतर काही दिवसांनी राणा दग्गुबतीचे लग्न झाले आणि त्याच्याबद्दल फसरलेल्या अफवांना पुर्ण विराम मिळाला. चाहत्यांना आजही राणा दग्गुबती आणि रकुल प्रीत सिंह यांची केमिस्ट्री पाहायला आवडते. याच कारणामुळे राणा दग्गुबती आणि रकुलचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

अनेक कार्यक्रमात एकत्रित स्पॉट झाल्याने दोघांच्या अफेअरची चर्चा जोरदार सुरू होती. या सगळ्यावरून रकुल राणाला डेट करत नसल्याचे म्हटले आहे, मात्र, त्याच्या अफेअरची चर्चा झाली असल्याचे दिसून येतं. यामुळे चाहत्यांना रकुल राणासोबत रिलेशनशिफमध्ये होती का नव्हती असा प्रश्न पडला आहे. तर सध्या रकुलने आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधत अभिनेता जॅकी भगनानी याला डेट करत असल्याचा खुलासा केला आहे.

रकुलने आपल्या इंस्टाग्रामवर 'थँक्यू माय लव्ह. यावर्षी तू माझ्यासाठी मोठे गिफ्ट होऊन आलाय. माझ्या आयुष्यात रंग भरण्यासाठी आपले धन्यवाद. मला नेहमी हसवण्यासाठीही धन्यवाद. सोबत आठवणी साठवू.' असे म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news