अहान शेट्टी पडला प्रेमात | पुढारी

अहान शेट्टी पडला प्रेमात

पुढारी ऑनलाईन : अभिनेता सुनील शेट्टीची कन्या अथिया शेट्टी फेब्रुवारीत 1 क्रिकेटपटू के. एल. राहुलबरोबर लग्नाच्या बेडीत अडकली. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यावर अथिया आणि के. एल. राहुलचा शाही विवाहसोहळा पार पडला. अनेक वर्षे डेट केल्यानंतर अधियाने राहुलशी विवाह केला. अथियानंतर आता तिचा भाऊ आणि सुनील शेट्टीचा चिरंजीव अहान शेट्टीही प्रेमात पडला आहे. अहान फैशन डिझायनर तानिया ऑफला डेट करत आहे.

नुकताच तानियाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीतील व्हिडीओ समोर आला आहे. यात अष्ठान आणि तानियाला एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. व्हिडीओत अहान तानियाबरोबर पापारासमोर फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. यानंतर सोशल मीडियावर अहान आणि तानियाच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत.

अहानने २०२१ मध्ये ‘तडप’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. अहान आणि तानिया बालपणीचे मित्र आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत.

Back to top button