Emraan Hashmi : आमच्यात डील | पुढारी

Emraan Hashmi : आमच्यात डील

पुढारी ऑनलाईन : अभिनेता इम्रान हाश्मीने ( Emraan Hashmi  ) ४४ वा वाढदिवस साजरा केला आहे. चित्रपटांमधील त्याच्या भूमिकांमुळे त्याला सीरियल किसर म्हटले जाते. त्याच्या या बोल्ड आणि किसिंग सीन्सवर त्याची पत्नी परवीन शाहनीची प्रतिक्रिया काय असते, असा प्रश्न एकदा त्याला विचारला होता.

‘ती अजूनही मला मारते, पण आता तुलनेने कमी मारते. आधी ती बॅगने मारायची. आता हाताने मारते’, असे इम्रानने २०१६ मध्ये त्याच्या ‘द किस ऑफ लाइफ’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी सांगितले होते. मी तिच्यासाठी हँडबॅग खरेदी करतो. प्रत्येक चित्रपटातील किसिंग सीनसाठी तिला एक बॅग गिफ्ट म्हणून देतो. तिच्याकडे बॅगांनी भरलेले एक कपाट आहे, तरीही तिला बॅगच हवी असते. आमच्या दोघांमध्ये ही डील झाली आहे.

एका चित्रपटाचं स्क्रिनिंग सुरू होते आणि शेजारी बसलेली माझी बायको मला नखे मारत होती. तू काय केलं आहेस, तू मला हे सांगितलं नाहीस, तू जे काही करतोय ते बॉलीवूड नाही. तिच्या नखांमुळे मला जखम झाली होती आणि रक्त वाहू लागलं होते. ( Emraan Hashmi  )

Back to top button