Swara Bhasker : घाघरा-ए-मुमताज; स्वरा झाली ट्रोल

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. स्वराने समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमदबरोबर कोर्ट मॅरेज केले आहे. लग्नानंतर आपल्या प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो स्वराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रिसेप्शन सोहळ्यात घातलेल्या पाकिस्तानी लेहेंग्यामुळे स्वरा ट्रोलही झाली होती. आता स्वराने एक नवा फोटो शेअर केला आहे.
स्वराने संगीत कार्यक्रमातील फोटो शेअर केला आहे. यात स्वराबरोबर तिचा नवरा फहादही आहे. दोघांनीही हिरव्या रंगाचे कपडे घातले आहेत. स्वरा भास्करच्या लेहेंग्यावर भरजरी काम केले आहे. स्वराचा रिसेप्शनचा फोटो पाहून लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरने तिला ‘घाघरा-ए-मुमताज’ म्हटले आहे तर ‘पाकिस्तानवर स्वराचे जास्त प्रेम आहे’, अशी कमेंट दुसऱ्याने केले आहे. यासोबतच एक युजर तिला टॅग करता म्हणतो की, ही राष्ट्रीय लाजिरवाणी आहे. ‘तुकडे तुकडे’ गँगचा भाग असल्याचे एका म्हटले आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram