Junaid Khan : आणखी एक स्टार किड पदार्पणाच्या तयारीत | पुढारी

Junaid Khan : आणखी एक स्टार किड पदार्पणाच्या तयारीत

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूडमधील नेपोटिझमबाबत आतापर्यंत खूपच चर्चा झाली आहे. अभिनेता सुशांतसिंह रजपूतच्या मृत्यूनंतर नेपोटिझमच्या वादाला एक वेगळे वळण लागले. आता आणखी एक स्टार किड लवकरच इंडस्ट्रीत पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरू आहे.

अभिनेता आमीर खानचा मुलग जुनैद खानला एका मोठ्या चित्रपटाची ऑफर आल्याची बातमी समोर आली आहे. सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी जुनैदला साईन केल्याचे बोलले जात आहे. तमिळ हिट चित्रपट ‘लव्ह टुडे’ च्या हिंदी रिमेकमध्ये आमीरच मुलगा मुख्य भूमिका निभावू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जुनैदशी या चित्रपटासाठी संपर्क साधण्यात आला असून त्याचे कास्टिंग लवकरच फायनल होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

‘लव्ह टुडे’ ह चित्रपट गेल्या वर्षी २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. ५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे १५० कोटींची कमाई केली होती. तमिळ चित्रपटात प्रदीप रंगनाथन आणि इवाना मुख्य भूमिकेत होते. जुनैदने यापूर्वी यशराज बॅनरच्य ‘महाराजा’ चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

Back to top button