Parineeti Chopra : परिणिती आणि राघव यांच्या रिलेशनशीपचा खुलासा; ते केवळ चांगले... | पुढारी

Parineeti Chopra : परिणिती आणि राघव यांच्या रिलेशनशीपचा खुलासा; ते केवळ चांगले...

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री परिणिती चोप्रा ( Parineeti Chopra ) , आम आदमी पक्षान्ना- नेता आणि पंजाब राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा चांगली रंगली आहे. एका रेस्टॉरंटबाहेर हे दोघे एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यातच दोघांनीही पांढऱ्या रंगाचे सारखेच कपडे घातले होते. त्यामुळे ते दोघे नक्की एकमेकांना डेट करत आहेत, असे सोशल मीडियावर बोलले जात आहे; मात्र या केवळ अफवा असल्याचे समोर आले आहे.

परिणिती ( Parineeti Chopra ) आणि राघव हे केवळ चांगले मित्र आहेत आणि ते एकमेकांना डेट करत नाहीत. मात्र, परिणिती आणि राघव या दोघांनी अधिकृतरीत्या याबद्दल काहीच म्हटलेलं नाही. परिणिती आणि राघव सलग दोन दिवस एकत्र दिसले, त्यामुळे या चर्चा सुरू झाल्या. मात्र, ते दोघेही चांगले मित्र आहेत. ते दोघे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिकले आहेत आणि त्यांचे बरेच कॉमन मित्र आहेत.

तसेच राघव ट्विटरवर केवळ ४४ जणांचा फॉलो करतात, त्यापैकी दोन बॉलीवूडमधील आहेत. त्यापैकी एक गुल पनाग आहे, तर दुसरी आहे परिणिती आहे. एकंदरीतच त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य सध्या तरी दिसत नाही. ते केवळ मित्र आहेत.

Back to top button