

बॉलिवुड किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कोठडीत आहे. त्यामुळे पुन्हा बॉलिवूडमधील स्टार किड्सवरून चर्चा सुरु झाली आहे. बॉलिवूडमध्ये सुशांत सिंह रजपूतच्या आत्महत्येनंतर सुर झालेला चौकशीचा ससेमीरा अजूनही सुरुच आहे.
बॉलिवुडमध्ये सेलिब्रेटींची जितकी चर्चा होते, तितकीच चर्चा त्यांच्या मुलांची सुद्धा होते. त्यामुळे ते काय करतात, काय नाही याबाबत अपडेट ठेवण्याकडे अनेक चाहत्यांचा कल असतो. लोकांमध्येही त्यांची बरीच उत्सुकता असते. आज या माध्यमातून आपण बॉलिवूडमधील सिक्रेट लव्हस्टोरीज पाहणार आहोत ज्या स्टार किड्सच्या होऊन गेल्या आहेत.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकला असला, तरी त्याची सिक्रेट लव्ह अफेअर्सनेही झाली आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीशी शिक्षणादरम्यान चांगलीच मैत्री झाली होती. या दरम्यान त्यांच्या लिंकअपच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या.
नव्याने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत शिक्षण घेतले आहे. दोघांनाही अनेकदा क्वालिटी टाईम घालवताना पाहण्यात आले आहे. अशा स्थितीत या दोघांच्या लिंकअपबाबत बऱ्याच अफवा पसरल्या गेल्या.
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरचे नाव अक्षत रंजनसोबत खूप जोडले गेले होते. नंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या.
शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचे नाव अहान पांडेसोबत जोडले गेले आहे. दोघांनाही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे.
काही महिन्यांपूर्वी सारा अली खान आणि केदारनाथ चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक जेहान हांडा यांचे फोटो व्हायरल झाले होते, त्यानंतर त्यांच्या लिंकअपबद्दल बऱ्याच अफवा पसरल्या होत्या.
आमिर खानची मुलगी इरा खानचे नाव फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेशी जोडले गेले आहे. दोघे नात्यात असल्याची चर्चा आहे.
अनन्या पांडेचे नाव ईशान खट्टर आणि कार्तिक आर्यन या दोघांशी जोडलेले आहे. काही महिन्यांपूर्वी अनन्या आणि ईशान मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेले होते.
हे ही वाचलं का?