Allu Arjun : अल्लू अर्जुनला तगडे मानधन

Allu Arjun : अल्लू अर्जुनला तगडे मानधन

पुढारी ऑनलाईन : प्रभासला मागे टाकत अल्लू अर्जुन ( Allu Arjun ) हा दाक्षिणात्य चित्रपटांतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. संदीप रेड्डी वंगा आणि भूषण कुमार यांच्या चित्रपटातून हिंदीत पदार्पण करणाऱ्या अल्लू अर्जुनने १२५ कोटी रुपयांचे मानधन आकारले आहे. यासह अल्लू अर्जुनने चित्रपटसृष्टीत एक नवीन ट्रेंड सुरू केला आहे.

अल्लू अर्जुन  ( Allu Arjun ) सध्या पुष्पा- २ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. प्रभासच्या स्पिरिटचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर अल्लू अर्जुन स्टारर संदीप रेड्डी वंगा आणि टी सीरिजच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. टी सीरिज आणि वंगा भारती प्रॉडक्शन निर्मित चित्रपटाचे शीर्षक भद्रकाली असू शकते.

टी सीरिजचे भूषण कुमार म्हणाले, आम्ही केवळ हिंदी चित्रपटांत काम करण्याची व्याप्ती तोडणार आहोत. आता आम्ही दक्षिण आणि प्रादेशिक सिनेमा सुरू करत आहोत. तसेच टी सीरिज आणि भद्रकाली प्रॉडक्शन अॅनिमल चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना झळकणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news