शाहरूखने जन्नत बंगल्याचे नाव बदलंल | पुढारी

शाहरूखने जन्नत बंगल्याचे नाव बदलंल

पुढारी ऑनलाईन : शाहरूख खान बॉविलूडमधील एक श्रीमंत अभिनेता आहे. वांद्रे येथे असलेल्या मन्नत या त्याच्या आलिशान बंगल्यात तो राहतो. शाहरूखच्या संपत्तीमधील या त्याच्या बंगल्याचा वाटा खूप मोठा आहे. शाहरूखचा हा मन्नत बंगला २७ हजार चौरस फूटचा आहे. २००१ पासून शाहरूख त्याच्या कुटुंबीयांबरोबर या बंगल्यात राहतो. हा बंगला शाहरूखने विकत घेण्यापूर्वी त्याचे नाव विएना असे होते.

२००१ मध्ये शाहरूखने १३.३२ कोटी रुपयांना हा बंगला विकत घेतला होता. शाहरूखने सुरुवातीला या बंगल्याचे नाव जन्नत ठेवले होते, पण नंतर ते बदलून मन्नत केले. शाहरूखने हा बंगला विकत घेतल्यानंतर पत्नी गौरी खानने एका आर्किटेक्टबरोबर मिळून त्याला इंटिरियर डिझाईनिंग केले. या बंगल्याला सहा मजले, अनेक खोल्या, एक अॅवॉर्ड रूम, एक छोटसे मूव्ही थिएटर, जिम आणि स्विमिंग पूलही आहे.

Back to top button