Gauri Khan : गौरीलाही शाहरूखचे कौतुक | पुढारी

Gauri Khan : गौरीलाही शाहरूखचे कौतुक

पुढारी ऑनलाईन : शाहरूख खानचा ‘पठाण’ प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांत अनेक विक्रम मोडले. केवळ भारतातच नाही, तर परदेशातही चित्रपटाने अनेक विक्रम केले आहेत. शाहरूखची पत्नी गौरीनेही पतीसाठी आनंद व्यक्त केला आहे.

गौरीने एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोत ‘पठाण’ सिनेमाची जगभरातील कमाई दिसत आहे. ‘पठाण ‘ने आतापर्यंत जगभरात १०२६ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. गौरीने खास फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, रेकॉर्ड ब्रेक असे म्हटले आहे. सध्या गौरीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गौरीच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. सध्या सर्वत्र गौरीच्या पोस्टची चर्चा रंगलेली आहे. खरे तर ‘पठाण’ सिनेमातून शाहरूखने चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. सिनेमाने जगभरात १०२६ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला असून, भारतात ५२८.८९ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

Back to top button