सलमानच्या ‘टायगर – 3 ‘ ची उत्सुकता | पुढारी

सलमानच्या 'टायगर - 3 ' ची उत्सुकता

पुढारी ऑनलाईन : अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून चाहते ‘टायगर-३’ ची प्रतीक्षा करत आहेत. ‘टायगर ३’ चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. अशातच आता या चित्रपटातील एक व्हिडीओ लीक झाला आहे.

‘एक था टायगर’ आणि ‘टायगर झिंदा है’ या चित्रपटांच्या यशानंतर सलमाननने ‘टायगर – ३’ची घोषणा केली होती. तर त्यानंतर या चित्रपटाबद्दलचे विविध अपडेट्स सलमान सोशल मीडियावरून चाहत्यांना देत होता. या चित्रपटात अभिनेता इम्रान हाश्मी नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले होते. पण आता या चित्रपटाची एक क्लिप खूप व्हायरल होत आहे.

सेटवरून लीक झालेला हा व्हिडीओ एका खोलीतील असल्याचे दिसत आहे. या खोलीत आजूबाजूला धूर दिसत आहे आणि त्यात इम्रान हाश्मी वावरत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर एखाद्या धमाकेदार सीनची तयारी सुरू असल्याचे लक्षात येत आहे. काही सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यावर चाहतेही प्रतिक्रिया देत असून सर्व जण या चित्रपटासाठी उत्सुक झाले आहेत.

Back to top button