'आरआरआर'चा आणखी एक विक्रम | पुढारी

'आरआरआर'चा आणखी एक विक्रम

पुढारी ऑनलाईन : एस. एस. राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून विक्रमावर विक्रम करताना दिसत आहे. चित्रपटाची चर्चा सातासमुद्रापारही रंगली आहे. चित्रपटातील नाटू- नाटू गाण्याने ग्रॅमी पुरस्कार जिंकत विक्रम रचला. आता या सिनेमाने हॉलीवूड क्रिटिक असोसिएशन अॅवॉर्ड – २०२३ वरही नाव कोरले आहे.

हॉलीवूड क्रिटिक्स असोसिएशनने ट्रिटर हँडलवरून ही बातमी शेअर केली आहे. ‘आरआरआर’ने अर्जेंटिना १९८५ या सिनेमाला मागे टाकत हा नवीन विश्वविक्रम रचला आहे. तसेच अन्य तीन श्रेणींतही या सिनेमाला पुरस्कार मिळाले आहेत. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाशिवाय सिनेमाला सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग आणि सर्वोत्कृष्ट अॅक्शन सिनेमा म्हणून गौरविले आहे. सर्वांना माझा नमस्कार, इतके प्रेम तुम्ही सर्वांनी दिले म्हणून आभार. आता यापुढे देखील तुमचं मनोरंजन करणे ही आमची जबाबदारी अभिनेता रामचरण म्हणाला.

Back to top button