Tamil Actor Vishal : ‘या’ अभिनेत्याचा काही सेकंदातच गेला असता जीव, चित्रिकरणावेळी ट्रक घुसला अन्…

Tamil Actor Vishal : ‘या’ अभिनेत्याचा काही सेकंदातच गेला असता जीव, चित्रिकरणावेळी ट्रक घुसला अन्…
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : तमिळ अभिनेता विशाल क्रिष्ण रेड्डी (Tamil Actor Vishal)बाबत मोठी दुर्घटना घडली. मार्क अॅन्टनी  चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अचानक एक ट्रक घुसला. अवघ्या काही सेकंदात अभिनेता विशाल याला या ट्रकच्या खाली सापडून जीव गमवावा लागला असता. इतक्या भीषण अपघातात वाचलेल्या या स्टार अभिनेत्याने ट्विटरवर पोस्ट करुन याची माहिती दिली आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ देखील त्याने शेअर केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मार्क अॅन्टनी या चित्रपटाचे चित्रिकरण (Mark Antony Shooting) सुरु होते. या चित्रकरणाच्या ठिकाणी जवळपास १०० हून अधिक लोक उपस्थित होते. यामध्ये स्पॉट बॉय, मेकअपमन, कॅमेरामन, काही तांत्रिक उपकरणे हाताळणारे लोक, अभिनेता विशालसहीत इतर सर्व कलाकार यावेळी उपस्थित होते. याच दरम्यान चित्रिकरणातील ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि १०० जणांच्या घोळक्यात हा ट्रक घुसला. या दुर्घटनेत अभिनेता विशालच्या (Tamil Actor Vishal) अंगावरुन हा ट्रक गेला असता, मात्र सुदैवाने त्याला कोणतीही इजा झाली नाही.

क्षणात ट्रकखाली चिरडला गेला असता अभिनेता

अभिनेता विशालने ट्विटरवर या घटनेची माहिती देत असल्याची पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण दुर्घटना पहायला मिळते. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, चित्रिकरणाच्या सेटवर सर्वजण उभे आहेत. कॅमेरामन शुटिंग करत आहे, विशाल खाली बसलेला आहे आणि त्याच्या मागच्या बाजुला एक ट्रक आहे. शुटिंगला सुरुवात होते. ठरल्याप्रमाणे अवजड ट्रकला त्याच्यामागे येऊन थांबायचे असते. मात्र होतं असं ट्रकमध्ये काही तांत्रिक बिघाड होतो आणि भरधाव वेगात तसाच पुढे सरकत होतो. हा क्षण इतका भयंकर दिसतो की ज्यामध्ये विशाल या ट्रकखाली चिरडणार अशी भीती सर्वांच्या मनात निर्माण होते. मात्र दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला.

विशालचे भावुक ट्विट : 'काही सेकंदातच गेला असता जीव, पण…'

चित्रपटाच्या स्क्रिप्टनुसार ठरलेल्या या चित्रिकरणात घडलेल्या या दुर्घटनेने उपस्थित सर्वांमध्ये मोठी खळबळ माजली होती. अगदी काही सेकंदात माझा जीव गेला असता, मात्र देवाच्या कृपेने मी वाचलो अशा आशयाचे विशालने ट्विट केले आहे. या अपघातामुळे त्याच्या चाहत्यांमधून काळजी घेण्याविषयीच्या सल्ला दिल्याच्या कमेंट केल्या जात आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news