Kriti Sanon : क्रितीनं प्रभासबरोबरच्या डेटच्या चर्चांना दिला पूर्णविराम !

Kriti Sanon
Kriti Sanon

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ( Kriti Sanon)  गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. क्रिती सध्या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता प्रभासला डेट करत असल्याच्या चर्चा होत आहेत. लवकरच प्रभास आणि क्रिती साखरपुडा करणार असल्याचेही बोलले जात होते. आता क्रितीने यावर प्रतिक्रिया दिली आहे आणि प्रभासला डेट करण्याच्या आणि साखपुड्याच्या चर्चांवर क्रितीने पूर्णविराम दिला आहे.

क्रिती ( Kriti Sanon) म्हणाली, जनता या गोष्टी दीर्घकाळ लक्षात ठेवत नाही. हे सगळे आता चर्चेत आहे; पण कालांतराने या चर्चा संपून जातील. अशाप्रकारच्या चर्चावर प्रतिक्रिया देणे मी नेहमीच टाळते. कारण, जेव्हा आपण यावर काही बोलतो तेव्हा अशा चर्चांना आणखी प्रोत्साहन मिळते; पण जेव्हा मला वाटते की, या सगळ्याचा परिणाम माझ्या कुटुंबीयांवर होत आहे किंवा एखादी गोष्ट आता मर्यादेपलीकडे जात आहे आणि माझ्या सन्मान, प्रतिमेला धक्का बसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news