Alia Bhatt : आलियामध्ये जबरदस्त ट्रान्स्फॉर्मेशन | पुढारी

Alia Bhatt : आलियामध्ये जबरदस्त ट्रान्स्फॉर्मेशन

पुढारी ऑनलाईन : नोव्हेंबर २०२२ मध्ये बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ( Alia Bhatt ) घरी छोटी परी राहाचे आगमन झाले. तेव्हापासून आलिया मातृत्वाचा आनंद घेत आहे. राहाला जन्म दिल्यानंतर काहीच दिवसांत तिने पुन्हा एकदा वर्कआऊट आणि योगा करायला सुरुवात केली होती. आता तिच्यात जबरदस्त ट्रान्स्फॉर्मेशन दिसून येत आहे. इतके की तिला ओळखणेही कठीण झाले आहे.

आलिया  ( Alia Bhatt ) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आरोग्याकडे आणि आहाराकडे ती नेहमीच लक्ष देत असते. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावरून तिने तिचे अनेक वर्कआऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले; पण आता तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात ती अगदी पंचविशीतील तरुणी दिसत आहे.

Back to top button