हा तर ऑस्करपेक्षाही मोठा सन्मान : चिरंजीवी | पुढारी

हा तर ऑस्करपेक्षाही मोठा सन्मान : चिरंजीवी

पुढारी ऑनलाईन : दाक्षिणात्य मेगास्टार चिरंजीवी आपला मुलगा रामचरणवरून खूपच भावुक झाल्याचे दिसून आले आहे. हॉलीवूडचे प्रख्यात दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचा एक व्हिडीओ चिरंजीवी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ते कॅमेरून यांच्या ‘आरआरआर’ चित्रपट आणि रामचरण याच्या भूमिकेचे कौतुक करताना दिसत आहेत.

कॅमेरून यांच्यासारखे दिग्गज दिग्दर्शक ‘आरआरआर’ आणि रामचरणचे कौतुक करत आहेत. हे काही ऑस्कर पुरस्कारपेक्षा काही कमी नाही, याचा मला अभिमान वाटत असल्याचे चिरंजीवी म्हणत आहेत, तर ‘आरआरआर’ हा एक जबरदस्त सिनेमा असून मी एकट्याने बसून सिनेमा पाहिला आहे. सिनेमा पाहिल्यानंतर मला अचंबितच झालो. चित्रपटात व्हीएफएक्स आणि स्टोरीटेलिंगचा सुरेख संगम साधला असल्याचे कॅमेरून यांनी म्हटले आहे.

Back to top button