लोक लायकीनुसार बोलत असतात : अनुपम खेर | पुढारी

लोक लायकीनुसार बोलत असतात : अनुपम खेर

पुढारी ऑनलाईन : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात अभिनेते अनुपम खेर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाबद्दल अभिनेते प्रकाश राज सातत्याने टीका करत आहेत. या टीकांवर आता अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा नेहमीच प्रामाणिकपणावर विश्वास आहे आणि इतरांना जे वाटते, त्यावर ते विश्वास ठेवू शकतात, असे अनुपम खेर म्हणाले.

केरळ चित्रपट महोत्सवात प्रकाश राज यांनी या चित्रपटावर टीका केली होती. तसेच या चित्रपटाला ऑस्करसाठी निवडण्यात आल्याच्या खोट्या दाव्याचीही खिल्ली उडवली होती. अनुपम म्हणाले, लोक त्यांच्या होती. अनुपम म्हणाले, लोक त्यांच्या लायकीनुसार बोलत असतात. तसेच काही लोकांना आपले आयुष्य बेईमानीने जगणे आवडते. ‘काश्मीर फाईल्स’ हा सर्वात बकवास चित्रपटांपैकी एक आहे; पण त्याची निर्मिती कोणी केली, हे आम्हाला माहीत आहे.

Back to top button