अदिती – सिद्धार्थ रिलेशनशिपमध्ये ! | पुढारी

अदिती - सिद्धार्थ रिलेशनशिपमध्ये !

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री अदिती राव हैदरीचा पूर्वाश्रमीचा पती सत्यदीप मिश्राने फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री मसाबा गुप्ताशी नुकतेच लग्न केले आहे. काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर घरीच मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता अदिती राव हैदरीच्या अफेअरची चर्चा सुरू झाली आहे.

अदिती दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षभरापासून या दोषांच्या अफेअरच्या चर्चा होत आहेत. दोघेही ‘महासमुद्रम’ नावाच्या तेलुगू चित्रपटात एकत्र काम करताना भेटले आणि प्रेमात पडले, असा दावा केला जात आहे. सिद्धार्थ आणि अदिती अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. त्यानंतर या दोघांमध्ये फक्त मैत्री नाही, तर ते प्रेमात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

Back to top button