'पुष्पा - २'मध्ये दिशा पटानी ? | पुढारी

'पुष्पा - २'मध्ये दिशा पटानी ?

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री समंथा रूथ प्रभू ‘पुष्पा’ या सुपरहिट ‘चित्रपटातील ‘ऊ अंतवा’ या आयटम साँगवर थिरकताना दिसली होती. समंथाच्या कारकिर्दीतील हे पहिलेच आयटम साँग होते आणि गाजलेही खूप. गेल्या काही दिवसांपासून निर्मात्यांनी पुन्हा समंथाला ‘पुष्पा – २’ साठी एका खास गाण्याची ऑफर दिली होती; मात्र तिने ऑफर नाकारली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यात तथ्य नाही. निर्मात्यांनी अद्याप समंथाशी संपर्क साधलेला नाही.

आता निमति ‘पुष्पा-२’साठी समंथाला कास्ट करण्याच्या मूडमध्ये नसल्याचे सांगितले जात आहे. ‘पुष्पा-२’ अभिनेत्री दिशा पटानीला संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटाचा पहिला पार्ट १७ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झाला होता. आता प्रेक्षक ‘पुष्पा-२’ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Back to top button