Ajay Devgn : अजय देवगण डॉ. ऑर्थोचे नवे ब्रँड अँम्बेसिडर | पुढारी

Ajay Devgn : अजय देवगण डॉ. ऑर्थोचे नवे ब्रँड अँम्बेसिडर

मुंबई : दिविसा हर्बल्स प्रा. लि. या प्रॉडक्टशी बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अजय देवगण ( Ajay Devgn ) यांचे नाव जोडले गेले आहे. मुंबई फिल्म स्टुडिओत गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कंपनीचे संस्थापक डॉ. संजीव जुनेजा यांनी सांगितले की, ऑर्थो पेन रीलिफ कॅटेगिरीत ग्राहकांचा विश्वास आपल्या टीमच्या मेहनतीमुळे संपादन केलेला आहे. ग्राहकांचा विश्वास लक्षात घेऊन बॉलीवूड सुपरस्टार, दिग्दर्शक, निर्माता अजय देवगण यांना ऑर्थोने ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड केली आहे.

अजय देवगण ( Ajay Devgn ) केवळ युवकांत नव्हे, तर सर्व वयोगटाच्या लोकांच्या मनावर राज्य करीत आहेत. सोशल मीडियात त्यांचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. ते अतिशय गंभीर अभिनेते आणि आपले विचार अत्यंत उत्तम पद्धतीने मांडतात. डॉ. जुनेजा यांनी सांगितले की, ऑर्थोने आतापर्यंत आयुर्वेदिक तेल, कॅप्सूल, वेदनाशामक स्प्रे, बाम आदी उत्पादने बाजारात आणली आहेत. आता कंपनी बाजारात आणखी काही उत्पादने बाजारात आणत आहे. त्यात डॉ. आर्थो निकॅप, पोश्चर कोरॅक्टर, रिस्ट ब्रेस्ट, सर्व्हायकल पिलो, लुम्बो सेक्रल बेल्ट यांचा यात समावेश आहे.

रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे सांध्यांचे विकार केवळ वयोवृद्धांतच नव्हे, तरुणांतही वाढले आहेत. तरुणांचा आयुर्वेदावर विश्वास असून, तो दिवसेंदिवस वाढत आहे. हा विश्वास वाढविण्यासाठी एक लोकप्रिय चेहरा गरजेचा होता. त्याचसाठी अजय देवगण यांची निवड आम्ही केली आहे, असे त्यांनी नमूद केले. अजय देवगण यांनी कंपनीसाठी काही फिल्म शूट केल्या असून, त्या लवकरच प्रसारित करण्यात येणार आहेत.

Back to top button