Kangana Ranaut : ‘बिचारा आमीर खान !’ | पुढारी

Kangana Ranaut : 'बिचारा आमीर खान !'

पुढारी ऑनलाईन : वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगना राणावत ( Kangana Ranaut ) नेहमीच चर्चेत असते. कंगनाने नेहमीच खान मंडळींना विरोध केला आहे. बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानवर आता कंगनाने निशाणा साधला आहे. आमीरला ‘बेचारा’ असा उल्लेख करत कंगनाने टीका केली आहे.

सध्या आमीरचा व्हिडीओ आणि कंगनाची ( Kangana Ranaut )  पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. नुकतेच लेखिका शोभा डे यांनी आमीरला सर्वात परफेक्ट अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न आमीरला विचारला. यावर दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट या तीन अभिनेत्रींचे नावे आमीरने घेतली.

त्यावर लोभा डे, आमीरला म्हणाल्या, ‘तू एका अभिनेत्रीचे नाव विसरत आहेस आणि ती आहे कंगना राणावत!’ यावर आमीर म्हणाला, ‘हो, कंगना ही चांगला अभिनय करू शकते’, असे व्हिडीओ दिसत आहे.

हा व्हिडीओ पोस्ट करत कंगनाने आमीरला सोड प्रत्युत्तर दिले आहे. बिचारा आमीर खान! तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारी मी एकमेव अभिनेत्री आहे. ही गोष्ट त्याला माहिती नाही हे दाखवण्याचा प्रयत्न अभिनेत्याने उत्तम केला. शिवाय शोभा डे यांची भूमिका आवडल्यामुळे कंगनाने त्यांचे आभार देखील मानले आहे.

Back to top button