Sanjay Dutt : संजय दत्त यांचा 'हा' कसला डान्स ? | पुढारी

Sanjay Dutt : संजय दत्त यांचा 'हा' कसला डान्स ?

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड अभिनेता संजय दत्त ( Sanjay Dutt ) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. संजय दत्तने लग्नाचा १५ वा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी संजयची पत्नी मान्यताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात संजय आणि मान्यता अमिताभ बच्चन यांच्या ‘कालिया’ चित्रपटातील ‘तुम साथ हो जब अपने’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत, पण या व्हिडीओमुळे संजयला ट्रोल केले जात आहे.

नेटकऱ्यांना मात्र संजयचा ( Sanjay Dutt ) अंदाज फारसा आवडलेला नाही. एक युजर म्हणतो, तो मान्यताला किती जोरात धक्का देत आणि किती जोरात स्वतःकडे खेचत आहे. हा कसला डान्स आहे? असे एकाने तर हे दोघेही जास्तच नशेत आहेत असे वाटत नाही का? असे अनेकांनी कमेंट केली आहे.

हा व्हिडीओ शेअर करत मान्यता म्हणते, ‘आम्ही चुका केल्या, आम्ही माफी मागितली, एकमेकांना दुसरी संधीही दिली, एकमेकांना माफ केले, आम्ही मज्जा मस्तीही केली.. आम्ही खूप ओरडलो, आम्ही हिंमतही ठेवली आणि प्रेमही केले. ‘ लग्नाच्या १५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! यावर चित्रपटसृष्टीतील अनेकांनी यावर कमेंट करत संजय आणि मान्यताला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

Back to top button