Kiara Advani : कियाराचे मंगळसूत्र दोन कोटींचे! | पुढारी

Kiara Advani : कियाराचे मंगळसूत्र दोन कोटींचे!

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ( Kiara Advani ) ७ फेब्रुवारी रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. लग्नानंतर कियाराचे तिच्या सासरी दिल्लीच्या घरी जंगी स्वागत झाले. यावेळी तिच्या लूकसह चर्चा झाली ती तिच्या मंगळसूत्राची. कियाराचे मंगळसूत्र प्रसिद्ध डिझायनर सब्यासाची मुखर्जी यांनी डिझाइन केले आहे. यासाठी सिद्धार्थने बराच खर्च केला आहे.

कियाराचे ( Kiara Advani ) मंगळसूत्र अगदी साधे आहे. सोन्याच्या साखळीत चारी बाजूंनी काळे मोती आहे. मध्यभागी एक मोठा हिरा आहे. सिद्धार्थने या मंगळसूत्रासाठी ४ कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, अद्याप त्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचे फोटोही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. कियाराने लग्नाच्या वेळी घातलेले दागिनेही चाहत्यांना पसंत पडत आहेत. तिच्या लग्नाचा लहेंगा फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केला आहे, तर कियाराचे दागिनेही त्यांच्याच कलेक्शनमधील आहेत.

Back to top button