Kangana Ranaut : ‘…तर मी तुमची शाळा घेईन’ | पुढारी

Kangana Ranaut : '...तर मी तुमची शाळा घेईन'

पुढारी ऑनलाईन : सध्या शाहरूख खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच २४ कोटीपेक्षा अधिक कमाई केली असल्याची चर्चा आहे. शिवाय पहिल्याच दिवशी ५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. काहीच दिवसांपूर्वीच ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू झाल्यावर अभिनेत्री कंगना रणावतने ( Kangana Ranaut ) रोखठोक मते मांडायला सुरुवात केली आहे.

अशातच ‘पठाण’ची हवा असताना कंगनाचे ट्रिट चर्चेत आले आहे. बॉलीवूडमधील लोकांनो, तुम्ही हिंदू द्वेषाचे बळी ठरले आहात, हे चित्र उभे करायचा प्रयत्न करू नका. द्वेषावर मिळवलेला विजय हा शब्द माझ्या पुन्हा कानावर पडला, तर मी तुमची चांगलीच शाळा घेईन. चित्रपटसृष्टीत इतकी मुर्ख माणसे आहेत की, कोणताही केलेला प्रयत्न, निर्मिती किंवा कला किती यशस्वी ठरली हे सांगण्यासाठी फक्त किती रुपये कमावले, हे दाखवले जाते, असे म्हणत कंगनाने अप्रत्यक्षरीत्या ‘पठाण ‘वरच निशाणा साधला. ( Kangana Ranaut )

Back to top button