Rich Rotella : अभिनेत्याने उंचीसाठी खर्च केले लाखो रुपये | पुढारी

Rich Rotella : अभिनेत्याने उंचीसाठी खर्च केले लाखो रुपये

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील कलाकार रिच रोटेला ( Rich Rotella ) हा आपल्या कमी उंचीमुळे त्रासलेला होता. रिच पाच फूट पाच इंचाचा होता. आता उंची वाढविण्यासाठी ८५ लाख खर्च केल्यानंतर त्याची उंची काही इंचाने वाढली आहे. रिचने उंची वाढवण्यासाठी लेग लेंथिंग सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. या सर्जरीवर त्याने तब्बल ८५ लाख खर्च केले. एवढे खर्च केल्यानंतर त्याची उंची झाली पाच फूट आठ इंच.

म्हणजे केवळ तीन इंचाने त्याची उंची वाढली. म्हणजे एका इंचाचा हिशेब केला तर रिचने एक इंचासाठी तब्बल २८.३३ लाख रुपये खर्च केलेत. रिच रोटेलाने ऑपरेशननंतर आनंद व्यक्त केला. लाखो रुपये खर्च करून रिचला तीन महिने फिजिओथेरेपी करावी लागली. तीन महिने त्याला व्हीलचेअरवर बसून राहावे लागले. तीन महिन्यांनंतर तो कुबड्या घेऊन चालत होता. मग हळूहळू तो चालण्यासाठी तयार झाला.

Back to top button