Kriti Sanon : परमसुंदरी ?; क्रितीचा परदेशात देशी लूक

Kriti Sanon : परमसुंदरी ?; क्रितीचा परदेशात देशी लूक

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ( Kriti Sanon ) आणि साऊथ स्टार प्रभास याच्या रिलेशनशिपच्या चर्चेना उधान आलं आहे. तर क्रितीचा नुकताच 'भेडिया' चित्रपट सिनेमागृहात दाखल होत जबरदस्त चाहत्याचे मनोरंजन करत आहे. याच दरम्यान क्रितीने एका जाहिरातीसाठी फोटोशूट केलं असून तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कॉमेन्टचा पाऊस पडला आहे.

अभिनेत्री क्रिती सेनॉनने ( Kriti Sanon ) तिच्या इंन्स्टाग्राम एका जाहिरातीसाठी केलेल्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केलं आहेत. यावेळी वेगवेगळ्या ड्रेसमध्ये ती हॉट आणि ग्लॅमरस दिसली. यावेळच्या क्रितीच्या व्हाईट- ब्ल्यू कलरचा लॉग घागऱ्याने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय ब्लॅक, लव्हेडर आणि ब्ल्यू- आकाशी रंगाच्या ड्रेसमधील वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत. प्रत्येक फोटोत क्रितीच्या हटके अंदाज पाहायला मिळालाय.

केसांची स्टाईल, कानात इअररिग्स, गल्यात भरजरी नेकलेस, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. यातील विशेष म्हणजे, क्रितीच्या प्रत्येक फोटोच्या मागील बाजूस एक आकर्षक आणि नयनरम्य निसर्ग दिसतोय. यावरून तिने हे फोटोशूट परदेशात केला असल्याचा अंदाज आहे. कधी टेरेसवर तर कधी झाडांच्या खाली तिने फोटोला पोझ दिल्या आहेत. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

क्रितीच्या या फोटोंवर 'Stunning you ????', 'Nice photos ?', 'My God ….So Hot …??', 'Gorgeous ?', 'Besttt❤️', 'wow???', 'परमसुंदरी ?', 'Beauty queen ❤️??', 'Gorgeous beauty', 'Very nice pic yaa!', 'मेरी जान तुम्हारी तो बात निराली है', 'Haiii allah itni beautiful??', 'Lovely ❤️❤️', 'Princess❤️?'. यासारख्या अनेक कॉमेन्टस चाहत्यांनी केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत साडेपाच लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news