परिणीती चोप्राला करायचेय दाक्षिणात्य चित्रपटात काम | पुढारी

परिणीती चोप्राला करायचेय दाक्षिणात्य चित्रपटात काम

पुढारी ऑनलाईन: बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने नुकतीच एक इच्छा व्यक्त केली आहे. परिणीती म्हणाली की, मला माझ्या करिअरमध्ये एक तरी दाक्षिणात्य चित्रपट करण्याची इच्छा आहे. मी दाक्षिणात्य चित्रपटाच्या स्क्रीप्टची वाट पाहात आहे. खरोखरच मी दाक्षिणात्य चित्रपट करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

तामिळ, तेलुगू, मल्याळम अथवा कन्नड अशा कोणत्याही भाषेतील चित्रपट करण्याची माझी इच्छा आहे. मला दाक्षिणात्य मोठ्या स्टारसमवेत चित्रपट करायचा आहे. मी फक्त चांगला चित्रपट, चांगली स्क्रीप्ट आणि चांगल्या निर्मात्याच्या चित्रपटाची वाट पाहात आहे. दक्षिणेत जबरदस्त चित्रपट तयार केले जातात यामुळेच मला दाक्षिणात्य चित्रपटात काम करायचे आहे. जर कोणी एखाद्या मोठ्या दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्याला ओळखत असेल तर खरोखरच माझा विचार करा.

Back to top button