प्रेमाने हाक मारा इतकंच!: जॅकी श्रॉफ | पुढारी

प्रेमाने हाक मारा इतकंच!: जॅकी श्रॉफ

पुढारी ऑनलाईन : जॅकी श्रॉफ हे ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी सुभाष घई यांच्या ‘हिरो’ चित्रपटातून बॉलीवूडमधून पदार्पण केले होते. जॅकी यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या सर्व यशाचे श्रेय ‘हिरो’ चित्रपटाला दिले. तो चित्रपट नसता तर आज मी नसतो, असे जॅकी श्रॉफ म्हणाले.

ते म्हणाले, माझे मूळ नाव जयकिशन आहे. माझी आई मला जग्गू म्हणायची आणि माझे मित्र मला जग्गू बाबा म्हणायचे. तर, माझे वडील मला जयकिशन म्हणायचे. काही लोक मला जय म्हणायचे, तर काही किशन म्हणून हाक मारायचे. माझी खूप नावे आहेत, तुम्ही मला कोणत्याही नावाने हाक मारा, पण प्रेमाने हाक मारा इतकंच!.

मी शाळेत असताना माझा एक मित्र होता. तो हाँग काँग की दुबईहून आला होता. त्याला माझे जयकिशन नाव खूप मोठे वाटत होते. त्यामुळे माझ्या नावाशी थोडे खेळायला हवे असे त्याला वाटलं. त्याने मला जय- की या नावाने हाक मारायला सुरुवात केली. नंतर ते जय-कीचं जॅकी झाले. असे ते म्हणाले.

Back to top button