पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री सोमी अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोमीने पुन्हा एकदा सलमान खानवर निशाणा साधला आहे. सोमीने सलमानसोबतचा जुना फोटो शेअर करत त्याच्यावर मारहाणीचा आरोप केला. मात्र या आरोपांनंतर काही वेळाने तिने ही पोस्ट डिलिट केली.
सोमी ही सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड होती. या दोघांचे नाते फार काळ टिकू शकले नव्हते. मात्र त्यांच्या अफेअरच्या चर्चा आजही होतात. सोमीने सलमानसोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला. यामध्ये सलमान तिला गुलाबाचे फूल देताना दिसत आहे.
आता बरेच काही घडणार आहे. माझ्या शोला भारतात बंदी आणली आणि मला धमकावले. 'तू भीत्रा आहेस. इथे माझ्या सुरक्षेसाठी 50 वकील उभे आहेत, जे मला सिगारेटच्या चटक्यांपासून आणि शारीरिक शोषणापासून वाचवतील. हेच तू माझ्यासोबत बरीच वर्षे करत होतास. त्या सर्व अभिनेत्रींना लाज वाटली पाहिजे, जे महिलांना मारहाण करणार्या या व्यक्तीची साथ देता', असे सोमीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.