‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांत प्रचंड उत्सुकता | पुढारी

‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांत प्रचंड उत्सुकता

पुढारी ऑनलाईन : प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रीलिज झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान उद्ध्वस्त झालेले जनजीवन आणि त्यामुळे उद्भवलेली भीषण परिस्थिती यासंदर्भातील वास्तव ‘इंडिया लॉकडाऊन’ मध्ये दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट ओटीटीवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020 मध्ये देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती, नंतर हा लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात आला. यादरम्यान अनेक लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागला. लॉकडाऊनच्या काळात वाहतूक व्यवस्था बंद असल्याने काही कामगारांनी तर आपल्या गावी पायी जाण्याचा निर्णय घेतला. याच लोकांची कथा या चित्रपटात दाखण्यात येणार आहे. झी-5 च्या यू्यूब चॅनलवर या चित्रपटाचा ट्रेलर रीलिज झाला.

‘इंडिया लॉकडाउन’ हा चित्रपट झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रीलिज केला जाणार आहे. या चित्रपटात प्रतीक बब्बर, श्वेता बासू प्रसाद, अहाना कुमार, प्रकाश बेलावेदी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरदेखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ती या चित्रपटात फुलमती ही भूमिका साकारणार आहे.

2 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वर्षातील मधुर भांडारकर यांचा ओटीटीवर रीलिज होणारा हा दुसरा चित्रपट असणार आहे.

Back to top button