जान्हवी कपूर : ओरहान माझा भक्कम आधार | पुढारी

जान्हवी कपूर : ओरहान माझा भक्कम आधार

पुढारी ऑनलाईन : जान्हवी कपूर कायमच चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांवरून तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यावरून ती चर्चेचा विषय बनत असते. तिचा ‘मिली’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. तेव्हापासून पुन्हा एकदा तिच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

जान्हवी काही महिन्यांपूर्वी ओरहान अवत्रमणीला डेट करत असल्याचे बोलले जात होते. ती दोघे अनेकदा एकत्र दिसल्यामुळे त्या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे, अशा चर्चा रंगल्या होत्या, पण काही काळाने त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले होते. आता ती दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने दोघे एकमेकांना डेट करत आहेत, असे म्हटले जात आहे.

अखेर जान्हवीने याबाबत मौन सोडले आहे. ती म्हणाली, ‘मी ओरीला अनेक वर्षांपासून ओळखते. तो माझा भक्कम आधार आहे. त्याने नेहमीच माझी साथ दिली आहे. मी त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकते असा तो आहे. माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे. असा मित्र मिळणं हे खरोखर माझे भाग्य आहे. आम्ही एकत्र असताना खूप मजा करतो. तो माझा खूप चांगला मित्र आहे.

Back to top button