पाठकबाई- राणा अडकणार लग्नाच्या बेडीत | पुढारी

पाठकबाई- राणा अडकणार लग्नाच्या बेडीत

पुढारी ऑनलाईन : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात राणा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आाणि अक्षया देवधर हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्याही घरी लगीनघाई सुरू झाली आहे.

काही दिवसांपुर्वीच अक्षया लग्नात नेसणार असलेल्या साडीच्या विणकामाचा श्रीगणेशा करण्यात आला होता. त्याचा व्हिडीओ अक्षयाने सोशल मीडियावर शेअर केला होता. आता अक्षयाने लग्नपत्रिकेचा फोटो शेअर करत त्याला ‘ऑन’ असे कॅप्शन दिले आहे. या फोटोला तिने ‘रांझणा’ या चित्रपटातील गाणे जोडले आहे.

अक्षयाने इंन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे. पत्रिकेवर अक्षया- हार्दीक असे लिहिलेले दिसत आहे. सोबत त्यावर चांदीचे पान
आणि सुपारी ठेवलेली दिसत आहे, पण यासह अक्षयाने लग्नाची तारीख मात्र, उघड केलेली नाही.

Back to top button