बिग बॉस मराठी ४ : हो तुझी लायकी काढणार : अमृता धोंगडे | पुढारी

बिग बॉस मराठी ४ : हो तुझी लायकी काढणार : अमृता धोंगडे

पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सुरु असलेल्या रोख ठोक या कार्यात उमेदवार आणि बाकीचे साक्षीदार बनलेले सदस्य आपल्या मनातील सर्व गोष्टी ठामपणे आणि न घाबरता बोलून दाखवत आहेत. कारण हा टास्कच मुळात त्यासाठी आहे.

किरण माने यांनी तेजस्विनीला मारलेला टोमणा असो वा तेजस्विनीने समृद्धीला मारलेला टोमणा असो. सगळेच सदस्य आपली बाजू मांडताना दिसत आहेत. कॅप्टन्सीचे उमेदवार अपूर्वा आणि अमृता देखील आपली बाजू मांडताना दिसणार आहेत. ज्यामध्ये अमृता देखील भर कोर्टात अपूर्वाला खडेबोल सुनावणार आहे.

अपूर्वाचे म्हणणे आहे की, अपूर्वा जर आवाज चढवते तर दुसऱ्यांचे ती नीट ऐकून पण घेते. अमृताचे म्हणणे आहे, जी मुलगी एखाद्या सदस्याची लायकी काढते तर हिला मी कॅप्टन म्हणून का घेऊ?. अपूर्वा त्यावर म्हणाली, याच्यावर दुनिया हसेल मला हे मान्य नाही. अमृता म्हणाली की, मला हि योग्य वाटतंच नाही. हो तुझी लायकी काढणार. यावरून बिग बॉसच्या घरात नवे वाद सुरू होणार आहे. यामुळे या शोची चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button