Kiara Advani : ग्लॅमरस ग्रीन टूपीसमधील वागणं अन् कियाची पर्स... (video) | पुढारी

Kiara Advani : ग्लॅमरस ग्रीन टूपीसमधील वागणं अन् कियाची पर्स... (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी ( Kiara Advani ) तिच्या अभिनयासोबत पर्सनल लाईफमुळे चर्चेत येत असते. कियारा सध्या बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर पसरली आहे. याच दरम्यान कियाराच्या एका व्हिडिओतून तिच्या वागण्याचे जोरदार कौतुक केलं गेलं आहे. तर तिने यावेळी घेतलेल्या छोट्या पर्सने सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

मुंबईतील जुहू येथे ऑस्करच्या ‘छेलो शो’ च्या स्क्रीनिंगला कियारासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. परंतु. कार्यक्रमात कियाराच्या वागण्याने आणि तिच्या वेशभूषेमुळे सर्वाच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. यावेळी कियारा ( Kiara Advani) स्क्रिनिंगहून बाहेर पडत असताना पायऱ्यांजवळ उभ्या असलेल्या पापाराझीच्या कॅमेऱ्याची नजर तिच्यावर पडली. यावेळी तिला थांबण्यास सांगून फोटो क्लिक करण्यासाठी चाहत्यानी एकच गर्दी केली. परंतु, यावेळी उपस्थितीत असणाऱ्याकडून एका वयस्कर व्यक्तीला धक्काबुक्की करण्यात आली. हे पाहून कियारा तेथील आजूबाजूला असणाऱ्यानावर भडकत म्हणाली की, वयस्कर व्यक्तीला पाहून जरा हळू चाला. हा कियाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून कियाराने वागण्याबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

यावेळी कियारा ग्रीन रंगाच्या प्रिन्टेड टूपीसमध्ये एकदम ग्लॅमरस दिसत होती. मोकळे केस, लिपस्टिक आणि मेकअपने तिच्या सौदर्यात भर घातली होती. परंतु, यावेळी तिने घेतलेल्या छोट्या पर्सने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. यावर काही चाहत्यांनी चक्क या पर्समध्ये कियाराने काय ठेवलय?, काय घेवून आलिया?, केवढी छोटी पर्स आहे? अलसे कॉमेन्टस करताना म्हटलं आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, आदित्य रॉय कपूर आणि विद्या बालन यांनी हजेरी लावली होती. याच दरम्यान कियारा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचलंत का? 

( video : varindertchawla, viralbhayani वरून साभार) 

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

Back to top button