Tanushree Dutta : साजिदला तनुश्रीचाही विरोध! | पुढारी

Tanushree Dutta : साजिदला तनुश्रीचाही विरोध!

पुढारी ऑनलाईन : ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम सध्या चांगलाच गाजत आहे. ‘बिग बॉस’मध्ये ‘मी-टू’चे आरोप असलेल्या साजिद खानची एन्ट्री झाल्यापासून निर्माते तसेच होस्ट सलमान खान याच्यावर जोरदार टीका होत आहे.

साजिद या कार्यक्रमात सहभागी झाल्यापासून त्याच्यावर कलाकारांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती मालिवाल यांनीही याला विरोध दर्शविला आहे. साजिदला आता तनुश्री दत्ताने विरोध केला आहे.

‘बिग बॉस’च्या घरात साजिदच्या प्रवेशामुळे तनुश्रीने तिची नाराजी व्यक्त केली. ‘मी घाबरले आहे. या कारवाईच्या निव्वळ बेजबाबदारपणाबद्दल आणि त्याचा जनतेवर होणारा परिणाम पाहून मी अवाक् झाले आहे,’ असे तनुश्री म्हणाली. साजिदवर
अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

Back to top button