Rakul Preet Singh : बॉयकॉटमुळे अनेकांना फटका बसतो! | पुढारी

Rakul Preet Singh : बॉयकॉटमुळे अनेकांना फटका बसतो!

पुढारी ऑनलाईन : आमिर खान आणि अक्षय कुमार या बड्या कलाकारांचे चित्रपट बॉयकॉट केल्यानंतर सोशल मीडियावरील ‘बॉयकॉट ट्रेंड’ जोर धरू लागला आहे. ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटालाही बॉयकॉटचा सामना करावा लागेल अशी स्थिती आहे. आता नुकतेच अभिनेत्री रकुलप्रीत सिंगने बॉयकॉटसंदर्भात आपले मत मांडले आहे.

रकुल म्हणाली, बॉयकॉटमुळे केवळ कलाकारच नाही, तर चित्रपटनिर्मितीच्या प्रक्रियेलाच फटका बसतो. या इंडस्ट्रीमुळे अनेकांना रोजगार मिळतो. बॉयकॉटमुळे त्यांच्या पोटावर पाय येऊ शकतो. आगामी ‘डॉक्टर जी’ चित्रपटाच्या निमित्ताने रकुलने यावर मत मांडले आहे.

‘डॉक्टर जी’ या चित्रपटात रकुल आयुष्मान खुरानाबरोबर झळकणार आहे. चित्रपट एका स्त्रीरोगतज्ज्ञाशी संबंधित आहे. या चित्रपटाबरोबरच रकुल अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ‘थँक गॉड’ मध्ये झळकणार आहे.

Back to top button