सोनाक्षी सिन्हा ब्रायफ्रेंड झहीरबरोबर स्पॉट | पुढारी

सोनाक्षी सिन्हा ब्रायफ्रेंड झहीरबरोबर स्पॉट

पुढारी ऑनलाईन : सोनाक्षी सिन्हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तिचा आणि हुमा कुरेशीचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोनाक्षी आणि हुमासोबत शिखर धवन देखील झळकणार आहे हे विशेष! आता सोनाक्षीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ मुंबईतील आहे, सोनाक्षी यामध्ये तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसोबत आहे. व्हिडीओमध्ये सोनाक्षीसोबत तिचा बॉयफ्रेंड अभिनेता झहीर इकबाल दिसत आहे. विशेष म्हणजे, यावेळी दोघांनीही कॅमेर्‍याकडे पाहून सुंदर पोझ दिल्या. मुंबईतील बांद्रा परिसरात सोनाक्षी आणि झहीर दिसले. सोनाक्षी आणि झहीरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सोनाक्षीचा लूक एकदम जबरदस्त दिसत आहे.

 

Back to top button