ट्रोल करणाऱ्यांना सबा आझादचे सडेतोड उत्तर | पुढारी

ट्रोल करणाऱ्यांना सबा आझादचे सडेतोड उत्तर

पुढारी ऑनलाईन; अभिनेता हृतिक रोशन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. अभिनेत्री सबा आझाद आणि हृतिक एकमेकांना डेट करत आहेत. हृतिक आणि सबा लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता; मात्र हृतिक आणि सबाची जोडी अनेकांना आवडत नाही. यामुळे सोशल मीडियावर बर्‍याच वेळा सबा ट्रोल होते.

हृतिक आणि सबामध्ये वयात खूप मोठे अंतर असल्याने या जोडीला ट्रोल केले जाते. ‘मुलगी आणि वडिलांची जोडी’ अशाही कमेंट नेटकरी यांच्या फोटोवर करतात. आता सबाने ट्रोलिंग करणार्‍यांचा समाचार घेतला आहे. हृतिक आणि सबाच्या फोटोवर ‘बाप-बेटी’ म्हणणार्‍या युजरच्या प्रोफाईलचा स्क्रीनशॉट सबाने शेअर केला आहे.

ही श्रुती आहे, तिला तिचे प्रेम आवडते; परंतु तिचा अमर्याद द्वेष शेअर करण्यासाठी ती मला फॉलो करते, तिच्यासारखे बरेच लोक आहेत. श्रुती तू मला अनफॉलो करू शकतेस. परंतु, तुला बहुतेक ब्लॉक कसे करायचे, हे माहिती नसावे; पण तुला हे नक्की लवकरच कळेल, असे म्हणत सबाने ट्रोलिंग
करणार्‍यांना उत्तर दिले आहे.

Back to top button