Samantha Ruth Prabhu : मी अजून संपलेली नाही! | पुढारी

Samantha Ruth Prabhu : मी अजून संपलेली नाही!

पुढारी ऑनलाईन; दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून समंथा तिच्या खासगी आयुष्यामुळे, तर कधी तिच्या आजारपणामुळे चर्चेत आहे. यानंतर ती सोशल मीडियावरूनही बाहेर पडली; मात्र, आता ती पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. यात तिने तिच्याबद्दलच्या सर्व चर्चांवरही भाष्य केले आहे.

अनेकदा ती तिच्या चाहत्यांसाठी फिटनेसचे अनेक व्हिडीओदेखील शेअर करत असते. गेल्या काही दिवसांत तिने फक्त तिच्या विविध चित्रपटांबाबत पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत; मात्र नुकतेच समंथाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या पाळीव श्वानाचा एक फोटो शेअर केला आहे. तिचा श्वान हा लिव्हिंग रूममधील सोफ्यावर मजा-मस्ती करताना दिसत आहे. मी आजारी आहे; पण संपलेली नाही, असा टोला तिने आता नेटकर्‍यांना लगावला आहे.

तिच्या या पोस्टवर अनेक नेटकरी लाईक्स आणि कमेंट करत आहे. अभिनेता वरुण धवन, राज अँड डीके, नंदिनी रेड्डी यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या सोशल मीडियावर परतण्यावरून आनंद व्यक्त केला आहे.

Back to top button