सनी देओलचा जबरदस्त लूक

सनी देओलचा जबरदस्त लूक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : सनी देओलचा 'चूप : रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी सनी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. सनीचे आणि त्याच्या मुलांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी सनीच्या मुलांचे कौतुक केले आहे.

राजवीर देओल आणि करण देओल हे सनीसोबत दिसले. मुलांची आणि बापाची ही जोडी चाहत्यांना आवडली असून या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. या व्हिडीओमध्ये तिघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहेत. हे तिघे कुठेतरी फिरायला गेले होते. त्यावेळी चाहते फोटो आणि व्हिडीओ यांच्यासोबत काढत आहेत. व्हिडीओमध्ये सनी देओलचा जबरदस्त लूक दिसतोय.

सनीच्या मुलांना पाहून नेटकरी म्हणाले की, जबरदस्त व्यक्तिमत्त्व. आता सनीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पूजा भट्टदेखील या चित्रपटात दिसणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news