प्रियांका चोप्रा : भारतात शिक्षणासाठी संघर्ष! | पुढारी

प्रियांका चोप्रा : भारतात शिक्षणासाठी संघर्ष!

पुढारी ऑनलाईन : नुकतेच प्रियांकाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांकासोबत मुलगी मालती देखील दिसत आहे. आमची पहिली ट्रिप प्रियांकाने ही पोस्ट शेअर करत काही इमोजीही शेअर केले आहेत. आता प्रियांका आणि मालती मेरी चोप्रा जोन्स यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रियांका ही मालतीला घेऊन एका खिडकीत बसल्याचे दिसत आहे. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र महासभेत जाण्यापूर्वी प्रियांकाने आपल्या लेकीसोबत हे फोटो काढल्याचे सांगितले जात आहे. संयुक्त राष्ट्र महासभेत प्रियांकाने अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले. यावेळी तिने भारतामधील काही भागांमध्ये अद्यापही मुलींना शिक्षणासाठी कशाप्रकारे संघर्ष करावा लागत आहे, याची माहिती सांगितली.

Back to top button