प्रकाश राज खरा नायक | पुढारी

प्रकाश राज खरा नायक

पुढारी ऑनलाईन : अभिनेता प्रकाश राज सध्या खास कामामुळे चर्चेत आहे. प्रकाश राजने तेलंगणातील एक गाव दत्तक घेऊन गावाचा विकास केला आहे. एखाद्या मोठ्या शहरात देखील एवढे सुंदर रस्ते नसतील तेवढे तेलंगणातील या गावात पाहायला मिळतात. त्यामुळे चित्रपटात खलनायकाची भूमिका करणार प्रकाश राज खर्‍या आयुष्यात नायकच ठरला आहे.

प्रकाश राज यांनी कोंडा रेड्डीपल्ली केशमपेट या गावाचे रूपडेच बदलून टाकल्याचे आहे. गावाचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. त्याच्या या कामामुळे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. तेलंगणाचे मंत्री केटीआर यांनी ही माहिती दिली आहे. केटीआर यांनी या गावाचे फोटो रिट्विट केले आहेत. त्यांनी प्रकाश राज आणि तेथील आमदारांचे कौतुकही केले आहे. यावर प्रकाश राजने कमेंट करत लिहिले की, हे सर्व काही तुमच्या पाठिंब्यामुळे झाले आहे.

Back to top button