Bollywood : बॉलिवूडचं बारसं कोणी केलं, माहित आहे?

Bollywood : बॉलिवूडचं बारसं कोणी केलं, माहित आहे?

पुढारी ऑनलाइन डेस्क : Bollywood सध्या बॉलिवूडला खूप वाईट दिवस आल्याचे दिसत आहे. या संपूर्ण वर्षात बॉलिवूडमधील प्रदर्शित चित्रपटांकडे रसिक प्रेक्षकांनी पाठ फिरवली. याची अनेक कारणे आहेत. तसेच सध्या सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलिवूडचा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे बॉलिवूडला सध्या उतरती कळा लागली आहे. म्हणूनच सोशल मीडियावर गमतीने असे म्हटले जात आहे बॉलिवूडने अंकतज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याचे नाव बदलावे किंवा त्याचे स्पेलिंग तरी बदलावे. यावरून अनेकांच्या मनात सहजच प्रश्न डोकावत आहे की बॉलिवूडला बॉलिवूड हे नाव कोणी दिले. बॉलिवूड नावाचा चित्रपटांशी काय संबंध आहे कोणी केलं बॉलिवूडचं बारसं. चला तर आज त्या आत्याबाईचा शोध घेऊ या जिने बॉलिवूड हे नामकरण केलं.

तसं तर Bollywood बॉलिवूडला बॉलिवूड हे नाव कोणी दिले याबाबतीत एक मतप्रवाह नाही. अनेकजणांचे याबाबतीत वेगवेगळे मत आहे. काही जण म्हणतात हॉलिवूडशी मिळते-जुळते नाव असावे म्हणून बॉलिवूड हे नाव प्रचलित करण्यात आले. तर काहीजण बंगाली आणि तेलगू चित्रपटाच्या टॉलिवूड नावावरून बॉलिवूड नाव पडले असे मानतात.

बॉलिवूड नावाची कल्पना प्रसिद्ध गीतकार अमित खन्ना यांची

हिंदी चित्रपटसृष्टीचे बॉलिवूड असे नामकरण प्रसिद्ध गीतकार अमित खन्ना यांनी केले, असे मानले जाते. अनेक जण त्यांना बॉलिवूड शब्दाचे जनक म्हणतात. अमित खन्ना यांनी सर्वप्रथम 70 च्या दशकात बॉलिवूड हा शब्द एका कॉलममध्ये लिहिला होता. तेव्हापासून बॉलिवूड हा शब्द हिंदी चित्रपटसृष्टीच्या नावाचा पर्याय बनला. अमित खन्ना यांच्या मते त्यांना पॅरलल चित्रपटातील कोरडेपणा आणि मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या बहुरंगीपणातील फरक या शब्दातून दाखवायचा होता. म्हणून त्यांनी मुंबईचे जुने नाव बंबईच्या 'बॉम्बे' आणि हॉलिवूडच्या वूडला एकत्र करून हिंदी चित्रपटाचे नामकरण केले बॉलिवूड.

अमिताभ यांना बॉलिवूड Bollywood हे नाव आवडले नव्हते!

गीतकार अमित यांनी जेव्हा बॉलिवूड हा शब्दप्रयोग केला. तेव्हा अभिनयाचे शहेंशा अमिताभ बच्चन यांना ते आवडले नव्हते. अमिताभ यांनी अमित यांना फोन करून बॉलिवूड शब्दाप्रती आपली नाराजी व्यक्त केली आहे. इंडस्ट्रीला हिंदी चित्रपट इंडस्ट्री असेच म्हणावे, अमिताभ यांचे मत होते.

कांदबरीकार एचआरएफ किटिंग यांना देखिल म्हणतात बॉलिवूड शब्दाचे जनक

कांदबरीकार किटिंग हे गुन्ह्यांवर आधारित थरारक कादंबरींसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या गुन्हेगारीवरील कादंब-यांवर अनेक मालिका निघत. या मालिकांमध्ये मुंबई सीआयडीचे निरीक्षक घोटे हे मुख्य व्यक्तिरेखा असायचे. त्यांनी त्यांच्या 1976 मधील एका कादंबरीत एका पात्राचा एक संवाद होता. ज्यामध्ये असे म्हटले होते की ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये लवकरच मोठी खळबळ माजवेल. त्याच्यानंतर बॉलिवूड हा शब्द हिंदी चित्रपट इंडस्ट्रीसाठी वापरू जाऊ लागला, असा ही एक मतप्रवाह आहे.

सिने कॉलमिस्ट बेविंडा कोलाको यांच्या कॉलममधून झाले बॉलिवूड Bollywood नामकरण

प्रसिद्ध सिने कॉलमिस्ट बेविंडा कोलाको यांना देखिल काहीजण बॉलिवूडच्या नावाचे श्रेय देतात. त्यांच्यामते सिने ब्लिट्ज मॅगझीनमध्ये फिल्म रिपोर्टर होते. तिथे त्यांना चित्रपटांच्या सेटवर सुरू असलेल्या गोष्टींचे रिपोर्टिंग करावे लागायचे. त्याचे स्पेशल कॉलम निघायचे. या कॉलमला काय नाव द्यावे यासाठी जेव्हा वेगवेगळे नाव सुचवले जात होते तेव्हा त्यांनी 'ऑन द बॉलिवूड बीट' जे सर्वांनाच आवडले. पुढे हेच नाव हिंदी चित्रपट इंडस्ट्रीजचा पर्यायी नाव बनले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news