रश्मिका मंदाना कपिलसोबत करणार चित्रपट | पुढारी

रश्मिका मंदाना कपिलसोबत करणार चित्रपट

पुढारी ऑनलाईन ; अभिनेत्री रश्मिका मंदानाला आता कोण ओळखत नाही? ‘पुष्पा’तील श्रीवल्लीच्या भूमिकेतून तिने देशभरात ओळख निर्माण केली. रश्मिका बॉलीवूड पदार्पणास सज्ज आहे. ती तीन चित्रपट सध्या करत आहे आणि आता कॉमेडी किंग कपिल शर्मासोबतही ती एका चित्रपटात दिसणार आहे.

दोघांनी सोशल मीडियातून या नव्या चित्रपटाची माहिती दिली आहे. सोबत ट्रेलर कधी येणार आहे, ती तारीखही सांगितली आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘मेगा ब्लॉकबस्टर.’ 4 सप्टेंबर रोजी या चित्रपटाचा ट्रेलर रीलिज होणार आहे. चित्रपटाच्या कथेबाबत कुणालाच काही कल्पना नाही; पण पोस्टरवर रश्मिका एखाद्या राजकीय नेत्याप्रमाणे दिसते. दोघांच्या कामाबाबत बोलायचे, तर कपिलचा ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ हा शो पुन्हा सुरू होत आहे.

रश्मिका हिंदीतील तीन ते चार चित्रपटांसह ‘पुष्पा 2’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या प्रोजेक्टमध्ये कपिलची आवडती दीपिका पदुकोन, तृषा कृष्णन, क्रिकेटपटू रोहित शर्मा, दाक्षिणात्य नायक कार्थी हेदेखील असणार आहेत. प्रत्येकाने आपापल्या लूकचे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत.

Back to top button