चुंबन द़ृश्यामुळे मागावी लागली पत्नीची माफी | पुढारी

चुंबन द़ृश्यामुळे मागावी लागली पत्नीची माफी

पुढारी वृत्तसेवा : हिंदी चित्रपटात एखाद्या हीरो किंवा हीरोईनचे चुंबन द़ृश्य किंवा बोल्ड सीन आजही चर्चेत राहतो. अलीकडच्या काळात ही सामान्य गोष्ट झाली आहे. ओटीटीवर तर अशा कंटेटचा पूर दिसतो. त्यामुळे सध्या अशा द़ृश्यांना हीरो हीरोईन नकार देत नाहीत; पण इंडस्ट्रीत असे काही कलाकार आहेत, ज्यांना ते स्वतः विवाहित असल्याने चुंबन द़ृश्य देणे महागात पडले होते. अनेकांच्या लग्नावर संक्रांत आली होती. काहींनी पत्नीची माफीही मागावी लागली होती, त्याविषयी…

आयुष्मान खुराना

आयुष्मानने जेव्हा ‘विकी डोनर’मधून पदार्पण केले होते, तेव्हा त्यात एक चुंबन द़ृश्य होते. त्यावर एकदा आयुष्मान म्हणाला होता की, हा चित्रपट त्याची बायको ताहिरा कश्यप आपला हात हातात धरून बघत होती आणि जेव्हा चुंबन द़ृश्य आहे तेव्हा तिने माझा हात झटकला. आणखी एका चित्रपटात आयुष्मानचा किसिंग सीन होता. त्यावर ताहिराने दिग्दर्शकाला काही हरकत नसल्याचे सांगितले; पण नंतर ती नाराज होऊन निघून गेली. त्यामुळे आता आयुष्मान किसिंग सीनसाठी नकार देतो.

अजय देवगन

अजयने ‘शिवाय’ चित्रपटात परदेशी अभिनेत्रीसोबत पहिल्यांदाच चुंबन द़ृश्य दिले होते. अजयची पत्नी काजोलला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा ती भडकली. कपिल शर्माच्या शोमध्ये बोलताना काजोल म्हणाली होती की, मला कळू न देता हे शूटिंग झाले होते. त्यावेळी मी ‘दिलवाले’ चे शूटिंग करत होते आणि मला चित्रपटातील गन आठवत होती. तिथेच गोळी घालावी, असे वाटत होते. त्यानंतर अजयला काजोलची हात जोडून माफी मागायला लागली होती.

अक्षयकुमार

अक्षयकुमार याने शिल्पा शेट्टीसोबत ‘धडकन’ चित्रपटात चुंबन द़ृश्य दिले होते, असे म्हणतात. तेव्हा त्याचा ट्विंकल खन्नाशी साखरपुडा
झाला होता. ट्विंकलला ही गोष्ट कळल्यावर दोघांत मोठे भांडण झाले होते. कारण, ट्विंकलआधी अक्षय हा शिल्पाला डेट करत होता. त्यानंतर मोठ्या पडद्यावर चुंबन द़ृश्य देणे अक्षयने टाळले

शाहरूख खान

शाहरूख बॉलीवूडचा किंग असेल; पण त्याच्या घरात गौरीच किंग आहे. त्यामुळेच शाहरूखने त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ‘नो किसिंग’ पॉलिसी समाविष्ट केली आहे. केवळ यश चोप्रांच्या ‘जब तक है जान’मध्ये शाहरूखने कॅटरिना कैफसोबत चुंबन द़ृश्य दिले आहे. अर्थात, तेही शाहरूखला साजेसे रोमँटिक आहे; पण त्यानंतर सर्वांसमोर, गौरीसमोर अशी द़ृश्ये करण्यात मी कम्फर्टेबल नाही, असे सांगत शाहरूखने अशी द़ृश्ये टाळली

Back to top button