सनीला काम मिळणे झाले मुश्कील | पुढारी

सनीला काम मिळणे झाले मुश्कील

अभिनेत्री सनी लिओनीने बॉलीवूड पदार्पण केल्याला आता दहा वर्षे उलटली आहेत. तथापि, सनीला मेनस्ट्रीममधील चित्रपट मिळालेले नाहीत. ती ठराविक चित्रपटांचाच भाग होत राहिली आहे. तसेच काही रिअ‍ॅलिटी शोज ती होस्ट करते. पण नुकतेच सनीने दिग्दर्शक अनुराग कश्यपचा चित्रपट स्वीकारला आहे. पूर्वी पॉर्न इंडस्ट्रीत काम करत असल्याने सनीला अजूनही चांगल्या भूमिका मिळत नाहीत.
याविषयी बोलताना सनी म्हणाली की, इंडस्ट्रीतील काही लोक माझ्यासोबत काम करायला कचरतात. काही लोकांना माझ्यासोबत काम करण्यात संकोच वाटतो.

कारण माझा भूतकाळ. पण कधीतरी या लोकांना माझ्यासोबत काम करण्याची संधी मिळावी. अनुराग आणि त्याच्या टीमचे आभार. त्यांनी माझा फोन उचलला आणि माझी ऑडिशन घेतली. सर्व काही संधी मिळण्यावर अवलंबून असते. हाच तो क्षण असतो जेव्हा तुमचे आयुष्य बदलते. ‘देव डी’, ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ बनविणार्‍या अनुरागसोबत काम करून माझे करिअर पूर्ण बदलले.

Back to top button