Shweta Shinde : लाल साडी अन केसांत गजरा…; श्वेता बनणार कलेक्टर ?

Shweta Shinde
Shweta Shinde
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लागीर झालं जी आणि देवमाणूस फेम आणि मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे ( Shweta Shinde ) पुन्हा एकदा छोच्या पडद्यावर अभिनयाची छाप सोडण्यास सज्ज झाली आहे. श्वेता शिंदेचा आगामी 'आप्पी आमची कलेक्टर' मालिका येवून येत आहे. याच दरम्यान तिच्या मराठमोळ्या लूकने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री श्वेता शिंदे ( Shweta Shinde ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर मराठमोळा साडीतील लूकमधील फोटो शेअर केले आहेत. यावे तिने गडद लाल आणि हिरव्या रंगाची साडी परिधान करून चारचॉद लावले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'नवीन प्रोजेक्टसाठी खूप उत्सुक आहे…❤️' म्हटले आहे. यावरून लवकरत ती पुन्हा नवी मालिका घेवून येत असल्याचे समजते.

श्वेताच्या इन्स्टाग्रामवरील आणखी एका फोटोत तिने 'आप्पी आमची कलेक्टर' या ठळक अक्षरातील मालिकेच्या नावाची पाटी तिच्या हातात दिसते. यावरून तिच्या मालिकेचे शुटिंग सुरू झाल्याचे समजते. ही माहिती चाहत्यांना मिळताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. या फोटोत मोकळे केसांत गजरा, मेकअप आणि कानातील झुमके यांनी तिच्या सौंदर्यात भर घातली आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस करत तिचे कौतुक केले आहे. यात एका युजर्सने So Beautiful, Osome looks, Nice, लंय भारी…❤️❤️❤️, Wowwww??, Superb ?यासारख्या कॉनेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही चाहत्यांनी हार्ट आमि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत्न जवळपास १८०० हून अधिक जमांनी लाईक्स केले आहे. 'आप्पी आमची कलेक्टर' ही मालिका श्वेता शिंदे आणि संजय खांबे निर्मित आहे.

श्वेता शिंदे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिच्या इन्स्टाग्रामवर नवनवीन एकापैक्षा एक हटके साडीतील फोटो पाहायला मिळतात. याआधी श्वेताने लागीर झालं जी, देवमाणूस, देवमाणूस २, साता जन्माच्या गाठी, मिसेस मुख्यमंत्री, अशा अनेक मालिकांची निर्मिती केली आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news